Homeताज्या बातम्यापुणे महानगर पत्रकार संघातर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती!

पुणे महानगर पत्रकार संघातर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती!

पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे महानगर पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सकाळी ८ वाजता भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची महाआरती पत्रकारांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या महाआरतीस पुणे महानगर पत्रकार संघाचे पदाधिकारी व शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी गणरायाची आरती करून सामाजिक सलोखा, पत्रकारितेची मूल्ये आणि लोकशाही बळकट होण्यासाठी प्रार्थना केली तसेच पत्रकार परिवाराकडून गणपतीस अभिषेक करण्यात आला. ट्रस्ट च्या वतीने पुणे महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद गव्हाणे यांचा सन्मान करुन पत्रकारांचे स्वागत करण्यात आले. सर्व उपस्थित पत्रकारांचा ट्रस्ट चे पदाधिकारी यांच्या सोबत फोटो घेण्यात आला. महाआरतीचा बहुमान दिल्या बद्दल पुणे महानगर पत्रकार संघाच्या वतीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले.

पत्रकारांच्या महाआरतीसाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, सचिव दिलीप आडकर तसेच अंश पिल्ले व ट्रस्टच्या कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डम्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
पुणे -मंहामदवाडी येथील रहेजा विस्टा परिसरात डंपरने दुचाकीला दिलेल्या भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला...

कुत्र्याने चावा घेतल्याच्या वादातून धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

0
वानवडीत श्वानदंशावरून झालेल्या वादातून तिघांवर गुन्हा दाखल   ​ पुण्यातील वानवडी येथील तात्या टोपे सोसायटीत ही घटना घडली.   ​ ९ सप्टेंबर रोजी रात्री सोसायटीत आरोपी श्वानाला...

इंद्रायणी वरील पूल कोसळला.

0
 वडगाव मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी सायंकाळी कोसळून भीषण दुर्घटना घडली. वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी पुलावर झाल्याने...

0
*ॲड. गुणाजी संभाजी मोरे यांची हिंदवी बहुजन सेनेच्या राष्ट्रीय प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती मुंबई:हिंदवी बहुजन सेना पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ॲड. गुणाजी संभाजी...

पणजी – भाजपचा 27 जागांवर विजय

0
पणजी - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे जिथे भाजपच्या 'बाबुश' पॅनेलने 27 वॉर्ड जिंकून ‘आमी पणजेकर’ यांचा पराभव केला आहे....

error: Content is protected !!