*ॲड. गुणाजी संभाजी मोरे यांची हिंदवी बहुजन सेनेच्या राष्ट्रीय प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई:हिंदवी बहुजन सेना पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ॲड. गुणाजी संभाजी मोरे यांची राष्ट्रीय प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दत्ता भुरे यांनी व पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
ॲड. मोरे यांनी सामाजिक व कायदेशीर क्षेत्रात सातत्याने कार्य करत बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवला आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्यशैली, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क यामुळे त्यांना कार्यकर्त्यांमध्ये विशेष मान्यता मिळाली आहे. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावरच पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी विश्वासाने सोपवली असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
या नियुक्तीमुळे पक्षाच्या संघटन विस्ताराला अधिक गती मिळेल, तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना नवे नेतृत्व व दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ॲड. मोरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
नियुक्तीनंतर बोलताना ॲड. गुणाजी संभाजी मोरे यांनी ही जबाबदारी म्हणजे सन्मान नसून कर्तव्य असल्याचे नमूद केले. “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कामातून सिद्ध करणार असून बहुजन समाजाच्या हक्कांसाठी अधिक जोमाने लढा देणार आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच संघटन अधिक बळकट करण्यासाठी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या नियुक्तीमुळे हिंदवी बहुजन सेनेला नवचैतन्य प्राप्त होऊन पक्षाची आगामी वाटचाल अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया राजकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ.



















